HELPLINE +91 7378929852

shoping cart:  0
0

no products

केसांची निगा

10-09-2018

 

  • केसांच्या मुळाशी नैसर्गिक तेल असते. या तेलाने केसांना पोषण मिळून ते घट्ट, काळे राहतात. केसांच्या मुळाशी असलेल्या तेलामुळे त्याच्या जवळच्या पेशी व अनेक बारीक नसांना हवेपासून म्हणजेच थंडी उष्णतेपासून रक्षण मिळते. हल्ली आधुनिक राहणीच्यापायी पुष्कळ जण रोज डोक्यावरुन साबाण लावून आंघोळ करतात. नैसर्गिक तेलाचा यामुळे नाश होतो. तेलाशिवाय केस कोरडे व राठ होऊन गळू लागतात. केस पुष्कळ गळल्याने डोक्याला टक्कल पडते. केस पांढरे होऊ लागतात.
  • तेल मालिश करावे. डोके खुप घासावे. हिवाळ्यात मोहरीच्या तेलाने व उन्हाळ्यात तिळाच्या तेलाने मालिश करावे. आयुर्वेदाचा प्रसाद रूप असे नारायण तेल बाराही महिने वापरता येते. मालिश हलक्या हाताने करावे. डोक्याला लावण्यासाठी कृपा हेअर टॅनिक हे औषध अतिशय उत्तम आहे. यामुळे केस मुळापासून मजबूत बनतात आणि केसांचे पोषण सुद्धा होते. कृपा हेअर टॅनिक ने मसाज केल्यास रात्रीची शांत झोप लागते. या मध्ये कपूर आहे त्यामुळे डोक्यास गारवा सुद्धा मिळतो.
  • मालिश केल्यावर तेलाच्या हाताने केस हळूहळू ओढा. केसाच्या मुळासी चोळा, तेलाचा हात असला तर या ओढण्याचा कंटाळा येत नाही. या ओढण्या, चोळण्याने केसांच्या मुळांना व्यायाम मिळतो. त्यामुळे नैसर्गिक तेल जास्त प्रमाणात झरू लागते. केस मुळाशी अधिक घट्ट होतात म्हणून गळतही नाहीत.
  • मालिश केल्यावर डोक्यावर हळूहळू थापट्या मारा, थोपटा, केस थोडेसे ओढा. या कसरतीने केसाच्या मुळाशी असलेली रंध्रे उघडी होतात. त्यातून नैसर्गिक तेल झरू लागते. रूधिराभिसरणाला गती प्राप्त झाल्याने मुळाजवळच्या अवयवांना रक्ताचा पुरवठा आवश्यक प्रमाणात मिळतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या नैसर्गिक तेलाचा खुराक मिळाल्याने केस काळे राहतात. मुळापासून गळत नाहित व घट्ट राहतात. केस मऊ, दाट व सुंदर दिसल्याने चेहराही चांगला दिसतो.
  • उन्हाळ्यात वा हिवाळ्यात उघड्या डोक्याने फिरू नका.

शिर्षासन आणि सर्वांगासन अशी आसने नियमितपणे केल्यास केस व मस्तकातील इतर अवयव यांना आश्चर्यजनक फायदा होतो. या आसनामुळे रूधिराभिसरणाची गती वाढते हे आपण मागे बघितलेच आहे. या आसनामुळे पांढरे झालेले केस कृत्रिम उपायांशिवाय काळे करणाच्या उपाय अजूनपर्यंत शोधलेला नाही हे सत्य आहे. पण तरूणपणातच ही दोन्ही आसने करीत गेल्यास केसांना भरपूर आरोग्य व पोषण लाभत असल्याने वृद्धावस्थेपर्यंत केस काळे राहतात व टक्कल पडत नाही. विशेषतः तरूणांनी ही आसने जरूर करा

Related Blogs