HELPLINE +91 7378929852

shoping cart:  0
0

no products

स्वस्थ केस म्हणजे काय ?

21-08-2018

आचार्यांनी नवजात बालकाच्या प्रत्येक अवयवाचे वर्णन करताना केसांचे वर्णन केले आहे. याचे बरेचसे वर्णन पुढेही (मोठे झाल्यावर) केसांना लागू पडते. ते म्हणतात.
एकैकजा मृद्‌वयोल्प: स्निग्धा: सुबद्धमूला:
कृष्णा: केशा: प्रशस्यन्ते ॥ ८/५१
केस कसे असावेत, तर प्रत्येक रोमकूपातून एक एक केस असावा. हे केस मृदू म्हणजे मऊ आणि अल्प म्हणजे कमी असावेत, स्निग्ध असावेत आणि त्यांचे मूळ बळकट असावे. केस काळेभोर असावेत. हे वर्णन प्रामुख्याने लहान मुलांसाठी सांगितले आहे. म्हणून कदाचित अल्प प्रमाणात असावे, असे म्हटले आहे. पण बाकी सर्व विशेषणे ही सगळ्यांसाठी लागू पडतात. त्यात बहुल हे विशेषण मोठ्यांसाठी आपण लावले तरी चालेल.
मग हे असे केस होण्यासाठी काय करायला हवे? त्या सर्व उपायांचे वर्णन पुढे दिले आहे. मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी, ती म्हणजे केसांची देखभाल नियमित झाली पाहिजे. थोडे काहीतरी केले आणि सोडून दिले असे चालणार नाही. आपण रोज अंघोळ करतो, दात घासतो, जेवतो, या सर्व गोष्टी नियमित करतोच; मग फक्त केसांसाठी कधीतरीच वेळ का?
केसांची स्वच्छता, त्यांचे पोषण, त्यांची देखभाल हे सर्व जन्मभरच करायचे आहे. किमान २-३ दिवसांनी केसांकडे बघायलाच हवे. आयुर्वेदामधील ग्रंथांच्या सहाय्याने बनवलेले कृपा हेअर टॉनिक हे केसांच्या देखभालीसाठी अतिशय गुणकारी आहे. 

नित्यं स्नेहार्द्र शिरसः शिरः शूलं न जायते|
न खालित्यं न पालित्यं न केशाः प्रपतन्ति च॥
बलं शिरः कपालानां विशेषेणाभिवर्धते|
दृढमूलाश्‍च दीर्घाश्‍च कृष्णाः केशा भवन्ति च॥ च.सू. ५

वरील दोन श्लोकांमधून चरकाचार्यांनी शिरोभ्यंग म्हणजे केसाला तेल लावण्याचे फायदे सांगितले आहेत.
अर्थ : डोक्याला नियमित तेल लावण्याने डोके दुखत नाही. टक्कल (खालित्य) पडत नाही, केस अकाली पांढरे (पालित्य) होत नाहीत व केस गळत नाहीत. शिरोभागाला व कपाळाला विशेषत्वाने बल प्राप्त होते. केसांची मुळे बळकट होतात व केस लांबसडक (दीर्घ) तर होतातच तसेच काळेभोरही होतात.
       कृपा हेअर टॉनिक हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. या मध्ये हरडा, मेंदी, आवळा, ब्राह्मणी अश्या एकूण १३ आयुर्वेदिक वनस्पती वापरल्या जातात. केसांसंधर्भातील सर्व रोग कृपा हेअर टॉनिक ने दूर होतात. 

Related Blogs